सोमवार, २५ जानेवारी, २०१६

लाईफची टेस्ट...

आपण नेहमीप्रमाणे छत्री विसरलेलो असतो,
तिने मात्र ती आठवणीने आणलेली असते.
पावसाची रिमझीम सुरु होते;
आपण तिला रिक्वेस्ट करतो,
का-कू करत ती 'हो' म्हणते.
आपणही मनात खूष होतो,
मधूनच छत्रीकडे सरकू पाहतो,
आणि ती छत्री आपल्याकडे लोटते.

चालता-चालता तिला कॉफी प्यावीशी वाटते,
आपण खिशाचा अंदाज घेतो,
आणि मग ऑफर करतो.
पण ती कॉफीसोबत सँडविचही मागवते.

आपण तिला मरिनड्राईव्हवर नेतो,
ती भेळची डिमांड करते;
आपण मात्र शेंगदाण्याची पुडी शेअर करतो.
ती त्यावर नाक मुरडते.
तोवर पावसालाही जोर चढतो,
ती टॅक्सीला हात देऊन निघून जाते.

तिचा निरोप घेऊन
आपण पुन्हा शेंगदाण्याच्या पुडीवर येतो.
खाता-खाता एक खवट शेंगदाणा मिळतो;
आपल्या लाईफची चवही
अशीच खवट झालेली असते.


२ टिप्पण्या: