शनिवार, ५ मार्च, २०१६

मला भावलेलं व्यक्तिमत्व- डॉ.चंद्रकांत भागवत चौधरी

     
         गुरुंना शिष्याचा अभिमान वाटावा, अशा कितीक शिष्यांच्या कथा प्रचलित आहेत.पण एखाद्या शिष्याला गुरुचा अभिमान वाटावा,असा अवलिया गुरु लाभणं,हे खरोखरच भाग्याचं ! असा गुरु मला मिळाला,याहून मोठं भाग्य ते काय!
        मी तेव्हा आठव्या इयत्तेत होतो. आजच्या इतकी तेव्हा स्पर्धा नसली, मुलांना चांगले मार्क्स पडावेत म्हणून सजग पालक मात्र होते.घरची परिस्थिती तेव्हा बेताचीच होती. तरीदेखील घरून आम्हाला क्लासेसला पाठवलं गेलं. क्लासेस हा तेव्हा व्यवसाय म्हणून चांगलाच नावारुपाला येऊ लागला होता.अगदी शाळांसारखे दोन शिफ्ट मध्ये चालणारे,वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळे शिक्षक असणारे,मुलींसाठी व हुशार विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग असणारे,मोठमोठे वर्ग असलेले वगैरे कितीतरी क्लासेस नाशिकमध्ये फोफावत होते.त्याबरोबर त्या क्लासेसची अव्वाच्या सव्वा फी म्हणजे पालकांच्या स्टेटसचा विषय!
        आमच्या आईने मात्र आम्हाली परवडेल अशा बडेजाव नसलेल्या चौधरी सरांच्या स्वामी समर्थ क्लासेस मध्ये आम्हाला पाठवलं.पहिल्या भेटीत आपलंस करणारं व्यक्तिमत्त्व,म्हणजे चौधरी सर.हळूवार बोलणं,मिश्किल वागणं, मन लावून पण गमतीदार पद्धतीने शिकवणं आणि वयाने लहानांनाही अहो-जाओ करणं, या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी सगळ्याच विद्यार्थ्यांना आपलंस केलं होतं.
         फक्त क्लासेसच्या फी वर घर चालवणारी ही व्यक्ती,व्यवहारीकदृष्ट्या मात्र शून्य होती.कोणत्याही विद्यार्थ्याला कधी स्वतःहून फी मागितली नाही किंवा कुणी किती फी दिली ,हे नोटा मोजून बघितलं नाही.इतर क्लासेसमध्ये फी गोळा करायला एक स्वतंत्र इसम असायचा,अशीही बाब इथे नव्हती.किती फुकट शिकले,याची गणनाच नव्हती.गणितातली अवघडात अवघड समीकरणं सोडवणा-या या व्यक्तीला,दुनियादारीचं समीकरण कधी जमलंच नाही.
        असं असेल तर संसार कसा चालेल? शेवटी मँडमना अर्थात सरांच्या पत्नींना कठोर व्हावं लागलं.मग सरांच्याच काही विद्यार्थ्यांना फी गोळा करण्याचं काम त्यांनी सोपवलं.तेही अगदी मनोभावे,ते काम करु लागले.विना फी   अटकाव करु लागले.पण त्यातही काही महाभाग थेट सरांना जाऊन भेटायचे आणि मुदत मागायचे. अर्थातच ही मुदतवाढ त्यांना मिळायची.
        एकदा असंच या फी गोळा करणा-यांनी फी साठी मला अडवलं.वडिलांचा पगार झाला नव्हता.मी म्हटलो,"सरांशी बोलतो मी." तर त्यांनी परवानगी दिली नाही.मग परत घरी आलो.तावातावाने आईला म्हणालो, "माझा अभ्यास मी घरी करेन.पण आता क्लासला जाणार नाही." सरांचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या उपस्थितीकडे वैयक्तिक लक्ष असायचं.मी दोन दिवस नाही आलो,हे लक्षात येताच सरांनी विचारणा केली.आणि कोणीतरी मी क्लास सोडल्याचं सरांना सांगितलं.क्षणाचाही विलंब न करता सरांनी आमचं घर गाठलं.मला समजावून आपल्या सोबतच क्लासला घेऊन आले.फी गोळा करणा-याला बजावलं,"यापूढे ह्या मुलाकडून कधीच फी घ्यायची नाही." आणि अगदी दहावी सुटेपर्यंत त्यांनी कधी फी घेतली नाही.
         एकदा क्लासची साफसफाई करताना मला सरांच्या ड्रॉव्हरमध्ये शंभराच्या,पन्नासच्या आणि दहाच्या काही नोटा व नाणी सापडली.सर येताच सरांना ते पैसे देत मी म्हणालो,"सर, हे असे कुलूप न लावता,तुम्ही यात पैसे कसे ठेवले?" त्यावर सरांनी किंचीत स्मित केलं व म्हणाले,"ते तिथेच राहू दे.नेहमी तिथेच असतात.ज्याला गरज असेल तो घेऊन जाईल.काम झालं की आणून ठेविल." आम्ही अवाक होऊन बघत राहिलो."कोणी चोरले तर?"यावर सरांचं उत्तर,"समजावं त्याला जास्त गरज होती."
        असं हे आगळं व्यक्तिमत्त्व.गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणंच नव्हे,तर त्यांना सगळ्या सोयी पुरविणे,अनाथ आश्रमांना कपडे व पुस्तकं गोळा करुन देणं,क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन परिसर स्वच्छता करणं असे कितीतरी उपक्रम त्यांनी राबवले.
        दहावीची परिक्षा संपली.आता क्लासशी असलेला शैक्षणिक संबंध संपला.पण इथूनच एक भावनिक नातं जुळत गेलं.आता सर मित्र होऊ लागले होते.आम्ही दोघं तासनतास वेगळवेगळ्या विषयावर गप्पा मारायचो,विचार विनिमय करायचो.वैयक्तिक आणि कौटुंबिक विषयही मुक्तपणे हाताळायचो.आता ते एक घरातली व्यक्ती होऊन गेले होते.

        पुढे शिक्षण,नोकरी निमित्ताने माझी प्रवरानगर, मुंबई, केनिया, रत्नागिरी, पुणे अशी भ्रमंती झाली.मधल्या काळात लग्नही झालं.सरांनी क्लासेस बंद केल्याचं कळलं.कुठल्याशा कॉलेज मध्ये लेक्चरर झाले.ऐकून खूप आनंद झाला.या काळात आमची क्वचितच भेट झाली.एकाही भेटीत सरांनी हालाखीत चाललेल्या परिस्थितीबद्दल काही सांगितलं नाही.एकदा असंच बोलता बोलता आईने सांगितलं,"तू केनियाला गेलास त्यानंतर सरांनी खूप हालाखीत दिवस काढले.किडनी स्टोनचा त्रास बळावत गेला.एकदा तर पोटात दुखू लागल्यावर रस्त्यातच पडले.दारुडा समजून किती वेळ कोणीच उचलेना.ऑपरेशन होईपर्यंत क्लासच्या मुलांची संख्याही रोडावली.काही परिक्षा देऊन कॉलेजला प्राध्यापक म्हणून लागले तर तिथे अवघे ९०० रुपये पगार.आठ किलोमीटर कॉलेजला चालत जात होते बिचारे.खूप वाईट दिवस काढले रे त्यांनी.हो पण आता देवाच्या कृपेने सगळं ठीक चाललंय" क्षणभर मनात हेलावलं.जेव्हा सरांना मदतीची,आधाराची गरज होती,नेमके तेव्हा आपण त्यांच्या जवळ नव्हतो.हो,पण एक व्यक्ती त्यांच्या सोबत कायम होती, त्या म्हणजे मँडम. त्यांनी सरांना प्रत्येक परिस्थितीत खंबीर साथ दिली.
      या सगळ्या हालाखीच्या परिस्थितीतही आपली शिकण्याची आवड त्यांनी जोपासली.आणि आपली शैक्षणिक वाटचाल सुरु ठेवली. पुणे विद्यापिठातील सर्वात जास्त पदव्या सरांच्या नावे आहेत.२४ फेब्रुवारी २०१६ रोजी सरांना पुणे विद्यापिठातून पी.एच.डी.मिळाली.सरांबद्दल लिहावं तेवढं कमी.बाकीचे क्लासेस मेरिटमध्ये येणारे हुशार विद्यार्थी बनवतात,सरांनी गुणवंत विद्यार्थी घडवले जे माणुसकीच्या मेरिटमध्ये अव्वल आले.सरांचा एकही विद्यार्थी त्यांना विसरला नाही,विसरणार नाही,ही त्यांनी कमावलेली खरी दौलत!!!!

सरांची थोडक्यात माहिती:

- Awarded of PhD titled as "A study of contribution of small and mediun enterprises to sustainable developement in Maharashtra with reference to small and medium enterprises in Nashik "
In faculty of commerce subject-Business Practices
Date of registration..4 th jan 2011
Date of declaration of result 24th feb 2016

- SSC from shraddha vidyamandir rahata
- BCom 1985
- MCom in 1987 from BYK college of commerce
( where he is now professor)
- Bachelor of laws in 1996
- LLB in 1998
- GDCA
- ADCS
- Govt Diploma in Cooperation and Accountancy Examination in 1998
- MBA with first class in 2007
  (Human Resource Development)
- Qualified Maharashtra State Eligibility Test( SET)in 2004
- ISO 9001:2008 Internal Auditor training Course in 2012
- Reiki First Degree in 1999
- Full time lecturer in Commerce from 2005

Other Activities conducted by him under his own Centre of training called BIBHA(BI FOR BIJALABAI AND BHA For BHAGAVAT)
having specialisation in HR development..sustainable developmnet...stress management..soft skills..devotion to nation..

- Conducted seminars and programs regarded
 soft skills..
- Personality development.
- Communication skills..
- SWOT analysis

- Workshops conducted on Human Resource Development...
- Disaster management Enriching human dynamics to govt offices such as Post Office ..prasar Bharati..NSS Officers..various engg colleges..arts commerce science colleges

- Arranged Training program of Meditation..
Yoga..
Vipassana

- Counseling sesaions to Undergraduate post graduate students for better career oppurtunities
- Actively participated in trekking and other adventure sports
- Attended hundreds of International and National seminars
- And most interesting and proud thing is he has highest number of degrees in University Of Pune.

Email..chaudharicb@gmail.com




1 टिप्पणी: