शनिवार, २१ जानेवारी, २०१७

आरंभ




शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

मरगळ




शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

लक्तरे

लक्तरे उडालेल्या दैवाकडून
मी काय अपेक्षा करावी?
जी कधी खरी होणारच नाहीत,
ती स्वप्नं तुला का दाखवावी?!!

अग मी तर ते गलबत
ज्याचा किनारा हरवलेला,
वाऱ्यानेही अर्ध्यात
माझा साथ सोडलेला.
अखंड तरत राहण्याची
तुज शाश्वती कशी दयावी?
जी कधी खरी होणारच नाहीत,
ती स्वप्नं तुला का दाखवावी?!!

बरसण्याची वेळ आल्यावर
पावसानंही तोंड फिरवलं,
अवर्षणानं गाव माझं
नेहमीच तृष्ण राहिलं.
तृषा तुझी भागविण्या
वर्षा मी कुठून आणावी?
जी कधी खरी होणारच नाहीत,
ती स्वप्नं तुला का दाखवावी?!!

असं नव्हे कि दुःख पेलण्याची
माझी तयारी नाही,
पण तुला दुःखी पाहण्याची
माझ्यात हिम्मत नाही.
मग तुज दुःखात बुडविण्याची
खंत कशास करावी?
जी कधी खरी होणारच नाहीत,
ती स्वप्नं तुला का दाखवावी?!!


बुधवार, ४ जानेवारी, २०१७

स्त्री..




मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

हव्यास