गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

हमालाचं मढं...


आज एक हमाल मेला,
ओझं उचलता-उचलता.

पण मढ्याच्या मुखावर स्मित होतं.
पोरांना तर उपाशी ठेवलं,
आता ते खातील काय?
जगतील कुणाकडे बघून?
म्हणून मरताना बराच रडला.
मग आता हे हसू कुठलं?

सावकाराचं कर्ज कोण फेडीलं?
गहाण झोपडं कोण सोडविलं?
पोरांचं कसं होईल?
हे प्रश्नचिन्ह नव्हतेच मुखावर.

मढं स्मितहास्य करत होतं,
जणू स्वर्गच लाभला होता त्याला.
मढ्याच्या हास्याचं कारण
कुणालाच कळलं नव्हतं.

चौघांनी उचललं तेव्हा
मढं खदखदून हसलं,
म्हणालं," वझं उचलू का?
पाच- धा रुपये द्या,
कालच्यानं पोरं उपाशी हायित."

http://pradeepmanemarathi.blogspot.com


मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

यावे उशीराने अन…